user

Wayam Magazine

Book and Periodical Publishing

View the employees at

Wayam Magazine

Overview

‘वयम्’ हे मासिक खास शालेय वयातील मुलांसाठी आहे. शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, गोष्टी, कविता, ललित लेख, कलाकृती, प्रयोग, कोडी, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’ हा संस्कृत शब्द - ज्याचा अर्थ ‘आपण सारे’ म्हणजेच ‘तुम्ही, आम्ही, आपण सर्व’ असा आहे. आपण सर्वांनी मिळून मुलांना वाचायला प्रेरणा देऊया! डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, कवी प्रशांत असनारे, प्रवीण दवणे, श्रीराम शिधये, फारुख काझी, डॉ. शरद काळे, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, एकनाथ आव्हाड, डॉ. उज्ज्वला दळवी असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’साठी लिहितात. ‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात - डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, श्रीकांत वाड, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे ही तज्ञ मंडळी आहेत. मुलांना वाचण्यासाठी वैविध्यपूर्ण असा ऐवज ‘वयम्’मध्ये असतो. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत आणि काही इंग्रजीतूनही असतो. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे बारकाईने लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या संपादक आहेत – शुभदा चौकर.